आम्ही ४ महिन्यापूर्वीच वलसाड हरिद्वार एक्ष्प्रेस्स(12911) या गाडीचे आरक्षण केले होते. या गाडीचे स्लीपर कोचचे टीकेट 606 रुपये आहे. ही गाडी हरिद्वार पर्यंत फक्त 13 वेळा थांबते.ही गाडी फक्त मंगळवारी दुपारी 3.40 ला सुटते आणि बुधवारी 4.30 ला हरिद्वार ला पोचते.या गाडीत pantry coach नसतो. म्हणून रात्रीचे जेवण घेऊन जाणे चांगले असते.
२० जून २०१७
आम्ही वलसाडहून दुपारी ३.४० ला गाडीत बसलो.
२१ जून २०१७
दुपारी ४.30 वाजता हरिद्वारला पोचलो. रेल्वे स्टेशनहून जवळच त्रिमूर्ती गल्लीत असलेल्या गोपालधाम आश्रम मध्ये 2 दिवसासाठी रूम घेतली.Family रूम प्रत्येकी ७०० रुपये. थोड्यावेळाने सगळे फ्रेश झालो. नंतर ६.३० ला हर की पौडी ला निघालो. हर की पौडीला रोज संध्याकाळी गंगा आरती होते. ही आरती बघण्यासाठी परदेशातून सुद्धा लोक येतात. गंगा आरती बघून आम्ही आश्रमला परत गेलो.
२२ जून २०१७
सकाळी परत आम्ही हर की पौडीला गेलो. तिथे मी वडिलांची अस्थी विसर्जन केले. आणि पिंड दान केले. नंतर आम्ही सगळ्यांनी गंगा स्नान केले. हर की पौडीला गंगा स्नान करण्यासाठी लाखो लोक जगाच्या कानाकोपऱ्यातून येतात.
नंतर नास्ता करून आम्ही मनसा देवीच्या दर्शनला निघालो. मनसा देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दोन रस्ते आहेत. तसेच तिथे जाण्यासाठी ट्रालीची सोय सुद्धा आहे. ट्राली मध्ये जाण्यायेण्यासाठी ९५ रुपये टिकेट आहे. मनसा देवीचे मंदिर डोंगर माथ्यावर आहे. मनसा देवीच्या मंदिराजवळच एक observation point आहे. त्या वरून पूर्ण हरिद्वाराचे सौंदर्य दिसते. मी मनसा देवीच्या मंदिरातून खाली येत होतो तेव्हा एक रिक्षा वाला चंडीदेवी जाण्यासाठी विचारत होता.
मी त्या रिक्षाने चंडी देवी च्या मंदिराच्या पायथ्याशी पोचलो. चंडीदेवीचे मंदिर हे सुद्धा डोंगर माथ्यावर आहे. तिथे जाण्यासाठी ट्रालीची सुविधा आहे. चंडी देवीचे मंदिर हे एक सिद्धपीठ आहे. चंडीदेवीचे मंदिर मनसा देवीच्या मंदिरापेक्षा जास्त उंचीवर आहे. तिथून जवळच अंजनी मातेचे मंदिर आहे. त्या मंदिरात संकटमोचन हनुमान तसेच संतोषी मातेची मूर्ती आहे.तिथून रिक्षाने मी गंगा घाटला पोचलो. गंगा घाटवरून चालत चालत मग रूमवर पोचलो.
दुस्र्यादिवसी आम्हाला बद्रीनाथला जायचे होते. त्या साठी वाहनाची व्यवस्था करायची होती. म्हणून मी एका travel agency कडे गेलो. हरिद्वारला खूप travel agency आहेत. आम्ही सगळे ११ जण त्या साठी मी एक टेम्पोट्रवलर घेण्याचे नक्की केले. हरिद्वार बद्रीनाथ हरिद्वार साठी १५००० तीन दिवसासाठी.
२३ जून २०१७
हरिद्वारहून आम्ही पहाटे ६.०० ला सर्वजण
बद्रीनाथ दर्शनाला निघलो. हरिद्वारहून बद्रीनाथ हे ३२० किलोमीटर अंतरावर आहे.
बद्रीनाथ हे चारधाम मधील एक तीर्थधाम
मानले जाते. हरिद्वार ते ऋषिकेश पर्यंत २२km चा सरळ रस्ता आहे. त्या नंतर नागमोडी
वळणाचा घाटाचा डोंगरी रस्ता सुरु होतो. आम्ही सर्वजण बयासी ला नास्ता करण्यासाठी
थांबलो. तिथून निघाल्यावर देवप्रयागला थांबलो. तिथे आम्हाला भागीरथी आणि अलकनंदा
यांचा संगम पाहायला मिळाला.भागीरथी नदी हि गंग्गोत्रीहून उगम पावते. भागीरथी आणि
अलकनंदा यांच्या संगमानंतर या नदीला पुढे गंगा नदी या नावाने ओळखले जाते.
तिथून
पुढे निघ्याल्यावर आम्ही रुद्रप्रयागला पोचलो. रुद्रप्रयगाला मंदाकिनी आणि अलकनंदा
या नदीचा संगम पाहायला मिळाला. मंदाकिनी नदीचे पाणी निळसर हिरव्या रंगाचे आणि
अलकनंदा नदीचे पाणी मातीच्यारंगाचे असून ते एकमेकांत येऊन मिसळतात.
दुपारच्या
जेवणासाठी रुद्रप्रयागहून थोड्या अंतरावर नगरासूला थांबलो. पुढे आम्हाला
कर्णप्रयागला अलकनंदा आणि पिंढरी नदीचा संगम पहावयास मिळाला.नंदप्रयागला अलकनंदा
आणि नंदाकिनी या नदीचा संगम होतो.पुढे जोशीमठ हे शहर येते. जर बद्रीनाथला पोहचायचे
असेल तर जोशिमठचा गेट ५ वाजण्याआधी पार करावा लागतो.५ वाजेनंतर जोशीमठच्या पुढे
जाण्याची परवानगी नाही.
जोशीमठ
नंतर विष्णुप्रयाग बघायला मिळतो.तिथे अलकनंदा आणि धौलीगंगा नदीचा संगम आहे. अरुंद
रस्ते,एका बाजूला डोंगर आणि दुसर्याबाजूला खोल दरी असे करत करत संध्याकाळी ७ वाजता
आम्ही बद्रीनाथला पोचलो. तिथे आम्ही काशीमठ मध्ये राहिलो.काशीमठ मध्ये प्रत्येक
रूमचे १००० भाडे आहे. बद्रीनाथला राहण्याच्या भरपूर सुविधा आहेत. ३०० रुपये भाडे
असलेल्या रूम पण आहेत. बद्रीनाथचे वातावरण एकदम थंड आहे.रात्रीचे तापमान ६ डिग्री
सेल्सिअस होते. रात्री बद्रीनाथ मंदिर खूप सुंदर दिसते. आम्ही जेवण आटोपून मग
बद्रीनाथ मंदिर बघायला गेलो. रात्री ८ नंतर बद्रीनाथ दर्शन बंद होते.
२४ जून २०१७
दुसऱ्यादिवशी
सकाळी आम्ही तप्त कुंड मध्ये स्नान केले.तप्त कुंड हे गरम पाण्याचे कुंड आहे.तप्तकुंडमध्ये
स्नान केल्याने त्वचेचे सर्व आजार बरे होतात आणि आपला आत्मा सुद्धा पवित्र होतो
अशी मान्यता आहे.
बद्रीनाथ
मंदिरात जास्त गर्दी नसल्याने तासाभरात देवाचे दर्शन झाले. बद्रीनाथला उंच उंच
पर्वत,काही पर्वतांवर बर्फ पाहायला मिळतो.बद्रीनाथचे वातावरण एकदम आल्हाददायक आहे.
बद्रीनाथला जाताना गरम कपडे घेऊन जाणे खूप गरजेचे आहे.तिथले वातावरण खूपच थंड आहे.समुद्रसपाटीपासून
बद्रीनाथ ३१०० मी. उंचीवर अलकनंदा नदीच्या किनाऱ्यावर आहे.बद्रीनाथ हे नर आणि
नारायण पर्वतरांगामध्ये वसले आहे.तिथून नीलकंठ पर्वत पहावयास मिळतो.
आम्ही
जेवणानंतर परतीच्या प्रवाशाला निघलो.रात्री पर्यंत आम्ही रुद्रप्रयागला पोचलो.तिथे
हॉटेलमध्ये रूम घेतली.८०० प्रत्येकी रूम. रूमच्या मागच्या बाजूला अलकनंदा नदी खळखळ
वाहत होती.रुद्रप्रयागला वनवे झाल्याने रुद्रप्रयाग शहर बायपास केले जाते.व रस्ता
रुद्रप्रयागच्या पुढे निघतो.तिथे राहण्यासाठी हॉटेलच्या सुविधा आहेत.
२५ जून २०१७
सकाळी ७ वाजता आम्ही ऋषिकेशला जायला
निघलो.ऋषिकेश हे शहर गंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. तिथे परदेशातून लोक योग
उपासना करण्यासाठी येतात.आम्ही १२ वाजेच्या सुमारास ऋषिकेशला पोचलो.आता आम्ही दोन
दिवस स्वामी सर्वत्मानंद यांच्या सर्वत्माधाम या आश्रमात राहणार होतो.सर्वात्माधाम
आश्रम गंगेच्या किनाऱ्यावर आहे. आश्रमाच्या मागच्या बाजूला गंगा नदी वाहते.
आश्रमात ५० ते ६० लोकांची राहण्याची सोय होऊ शकते इतका मोठा आश्रम आहे. आम्ही
आश्रमात पोचलो.गुरुजींनी हसतमुखाने आमचे स्वागत केले.आम्हाला मंदिरात बसायला सांगितले.आम्हाला
थंड पाणी प्यायला दिले.पाणी पिऊन मंदिरात बसल्यावर प्रवासाचा सगळा थकवाच निघून
गेला. थोड्यावेळाने गुरुजी आले. त्यांनी आम्हाला प्रवचन दिले. त्यांनी आम्हाला
किचन मध्ये काही बनवून खायला सांगितले. थोड्यावेळाने ताईने खूप छान गरम गरम जेवण बनवले. खूप दिवसानंतर घरच्यासारखे गरम
गरम आणि चांगले जेवण जेवून खूप आनंद झाला. थोड्यावेळ जेवून आम्ही गंगेच्या
किनाऱ्यावर बसलो.नंतर सगळ्यांनी गंगा
स्नान करायचे ठरवले. गंगेचे पाणी खूप थंड होते.
थंड पाण्यामुळे मध्ये जायला खूप हुरहूर वाटत होती. हळूहळू पाण्यात बसलो नंतर पाणी
थंड लागणे कमी झाले आणि नंतर पोहण्याचा आनंद येऊ लागला.गंगा स्नानाचा मनसोक्त आनंद
घेतल्यानंतर आम्ही आश्रमात परतलो. संध्याकाळी आम्ही लक्ष्मणझुला बघण्यासाठी गेलो.लक्ष्मणझुला हे लोखंडी ताराने बनलेले झुलते पूल आहे.असे सांगितले जाते कि या ठिकाणाहून तागाच्या दोरखंडच्या सह्हाय्याने गंगा नदी पार केली होती तिथे हा लक्ष्मण झुला बनवलेला आहे.
संध्याकाळी जेवणानंतर परत आम्ही गंगेच्या
किनाऱ्यावर बसलो. एकदम शांत वातावरण,थंड हवा,नदीचा खळखळ आवाज,आकाशात पांढरेशुभ्र
चांदणे सगळे खूपच सुंदर वाटत होते.तिथे गेल्यावर प्रत्यक्ष अनुभव होतो कि जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक शांत वातावरणासाठी गंगेच्या
किनारी ऋषिकेशला येतात.दुसया दिवसी आम्ही सगळ्यांनी नीलकंठ महादेवाच्या दर्शनाला
जायचे ठरवले.
२६ जून २०१७
सकाळी आम्ही चायनास्ता करून निघलो. नीलकंठ
महादेव हे मंदिर डोंगर माथ्यावर आहे. पुराणानुसार मानले जाते कि नीलकंठ महादेवचे मंदिर आहे तिथे भगवान शंकरानी समुद्रमंथनातून निघालेले विष प्राशन केले होते. म्हणून या जागेला नीलकंठ महादेवच्या नावाने ओळखले जाते. नीलकंठ महादेवला जाण्यासाठी लक्ष्मणझुला तसेच रामझूला जवळून जीपची सोय आहे.लक्ष्मणझुला ते नीलकंठ महादेव हे २२ km चे अंतर आहे.जीप मध्ये
जाण्यायेण्यासाठी प्रत्येकी १२० रूपये आकारतात. ज्या जीप मध्ये जातो त्याच जीपने
परत यायचे असते.जीपवाले तिथे पोचल्यावर परत १.३० तासाने परत यायला सांगतात.आम्ही
११ च्या सुमारास नीलकंठला पोचलो.तिथे गेल्यावर कळले नीलकंठ ते लक्ष्मणझुला पायी
रस्ता आहे.जाताना मी आणि मामा यांनी पायीजाण्याचे ठरवले. बाकी सगळे जण जीपने
लक्ष्मणझुला पर्यंत पोचले.नीलकंठहून पायी लक्ष्मणझुला पोहचण्याचा मार्ग हा १० ते
१२ km असावा.सुरवातीला ३ ते ४ km ची चढाई आहे आणि त्यानंतर उताराचा रस्ता आहे.मी
आणि मामा हळूहळू चालत निघलो.वर जिथे चढाई संपते तिथून सगळे रमणीय दृश्य दिसत होते.
हिरवेगार उंच डोंगर प्रेक्षणीय आहेत. तिथून हनुमानाचे आणि अजून वर पर्वतीमातेचे
मंदिर दिसते.आम्ही चालत संध्याकाळी ५ च्या सुमारास खाली पोचलो.